कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी.
कोकणवासियांचा जनआक्रोश..! रेल्वे टर्मिनसचा..!! तो ही प्रजासत्ताक दिनी..!!!
अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती सलग्न संघटनांकडून
संगमेश्वर आणि सावंतवाडी येथे आयोजन.
येणाऱ्या प्रजासत्ताक दिनी कोकणवासिय आपल्यावर होत असणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणार आहेत.
वास्तविक बघता कोकणा सारखा निसर्गरम्य परिसर, इथले समुद्र किनारे, येथील धार्मिक स्थळे ही देशात प्रसिद्ध आहे, त्यातच कोकणातील सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा. पण इथले पर्यटन बहरावे असे राज्यकर्त्यांना वाटत नसावे कारण पर्यटनाचा मुख्य गाभा हा दळणवळण आहे. त्यात रेल्वे ही कोकणातील दळणवळणाची मुख्य साधन आहे.
सध्याची वास्तवता बघता, कोकण रेल्वे महामंडळ हे भारतीय रेल्वेचा भाग नसल्याने कोकणवासियांना त्याचा त्रास अधिकाधिक जाणवत आहे. कोकण रेल्वेच्या एकेरी मार्गामुळे गाड्या चालवण्याचा क्षमतेवर नक्कीच बंधने आहेत. फक्त कोकणापुरती गाड्या चालवणे हे ही कोकणवासियांची मागणी गेली अनेक वर्षे परिपूर्ण टर्मिनस अभावी पूर्ण करण्यात आली नाही.
त्यामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटना तर्फे कोकण रेल्वेचे विलीनीकरण, दुहेरीकरण, आणि परिपूर्ण सावंतवाडी टर्मिनससाठी रेल रोको आंदोलन सावंतवाडी रेल्वे स्थानकात करण्यात येत आहे.
पुन्हा एकदा हर घर टर्मिनस मेल मोहीम..!!
एक मोहीम घरातून, घरातल्या सर्व मोबाईल मधून..
मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना कोकणवासियांचे अनावृत पत्र..📝📝
सावंतवाडी टर्मिनस चे भूमिपूजन आपण केलात, आता उद्घाटन देखील आपणच करावे ही समस्त कोकणवासियांची भावना.
कोकणातील बंधु-भगिनींनो,
कोकणकरांच्या सुखकर व निर्विघ्न प्रवासासाठी, न्यायासाठी सावंतवाडी येथे रेल्वे टर्मिनस व्हावे जेणेकरून आम्हा कोकणवासियांना हक्काच्या गाड्या मिळतील यासाठी आपल्या आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना शेकडोच्या संख्येने ईमेल पाठवायचे आहेत. सोबत अनावृत्त पत्र दिले आहे, त्यात स्व:ताचे नाव व मोबाईल नंबर टाकून आपल्या ईमेल ने सन्माननीय मुख्यमंत्री तसेच महाराष्ट्र राज्याचे मंत्री, सचिव, संबंधित विभागाला पाठवायचे आहेत.
येणाऱ्या २६ जानेवारी पुर्वी हजारोंच्या संख्येने ईमेल सर्व बांधव, भगिनी, कोकणवासी, सार्वजनिक मंडळ, कोकण विकास समित्या, सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांच्या घराघरातून सर्वांनी वैयक्तिक पाठवायचे आहेत. हा लढा हक्काचा- अधिकाराचा- न्यायाचा आहे. तुमचा एक मेल तुमच्या भावी पिढ्यांना हक्क, अधिकार व कोकणवासींचे मनोबल वाढीसाठी उपयोगी ठरणार आहे.
फक्त एका टिचकीवर हे निवेदन उघडेल व आपण आपले नाव मोबाईल क्रमांक टाकून ते पाठवायचे आहे.